रॉशच्या अँटीबॉडी कॉकटेल वापरास भारताची मंजुरी

भारतात करोना संक्रमणाचा वेग वाढत असताना करोनाशी लढण्यासाठी आणखी एक हत्यार आता उपलब्ध झाले आहे. स्वित्झर्लंडच्या रॉश औषध कंपनीने रीजनेरॉन कंपनीच्या सहकार्याने विकसित केलेल्या आणि करोना उपचारात महत्वपूर्ण कामगिरी बजावत असलेल्या अँटीबॉडी कॉकटेलच्या वापरास भारत सरकारने आपत्कालीन वापर मंजुरी दिली आहे. बुधवारी रॉशने या संदर्भात घोषणा केली.

रॉशने सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन भारतात करोना रुग्णांवर उपचारासाठी या औषधाच्या वापरास मंजुरी दिल्याचे जाहीर केले. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व्ही सिम्पसन इमॅन्यूअल म्हणाले, या औषधाने आम्ही करोना रुग्णांमुळे हॉस्पिटलवर येत असलेला ताण आणि हेल्थकेअर सिस्टीम वरचा असह्य ताण कमी करण्यासाठी प्रतिबद्ध आहोत. करोनामुळे रुग्णाची तब्येत अधिक बिघडण्यापासून हे अँटीबॉडी कॉकटेल महत्वाचे योगदान देत आहे. हे कॉकटेल म्हणजे CASIRIVIMAB , IMDEVIMAB  असे मिश्रण असून १२ वर्षावरील रुग्णांपासून ते वयोवृद्ध रुग्णांना देता येते. १२ वर्षाच्या रुग्णाचे वजन ४० किलो पर्यंत असेल तर हे औषध वापरता येते.

भारतात सिप्लाच्या सहकार्याने हे अँटीबॉडी कॉकटेल वितरित केले जाणार असून सर्व हॉस्पिटल्स आणि कोविड सेंटरवर ते उपलब्ध केले जाणार आहे.