मला होऊच शकत नाही करोना- इति राखी सावंत

बॉलीवूड अभिनेत्री आणि बिग बॉस फेम राखी सावंत नेहमीच काही तरी विचित्र विधाने करत असते. तिच्या विधानांमुळे अनेकदा लोकांवर हैराण होण्याची पाळी येते. देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असताना राखीने असेच एक हैराण करणारे विधान केले आहे. तिच्या मते तिला आणि तिच्या परिवाराला कधीच करोना होऊ शकत नाही.

राखीच्या म्हणण्यानुसार तिच्या शरीरात जीझसचे पवित्र रक्त आहे त्यामुळे ती कधीच करोनाच्या विळख्यात येणार नाही. देशात लसीची कमतरता आहे त्यामुळे तिच्या वाटणीची लस गरजवंताला दिली जावी असेही ती सांगते. बुधवारी राखीला एका कॉफी शॉप बाहेर पाहिल्यावर तिला फोटोग्राफर ने काही प्रश्न विचारले तेव्हा तिने वरील उत्तर दिले.

राखीने कंगना राणावत हिलाही सल्ला दिला आहे. कंगणाचे अकौंट ट्विटर वरून सस्पेंड झाले तेव्हा राखी म्हणते, असली विधाने म्हणजे देशाविरुध्द गद्दारी आहे. त्यापेक्षा कंगनाने लोकांची मदत करावी, करोना काळात ऑक्सिजन कमतरता आहेत तेव्हा तिने ऑक्सिजन सिलिंडर वाटावेत.