मक्केतील पवित्र ‘काला पत्थर’चे फोटो प्रथमच प्रसिध्द

मक्केतील काबा मधील पवित्र ‘काला पत्थर’ म्हणजे ब्लॅक स्टोनचे अद्भूत फोटो प्रथमच जगासमोर आले असून सौदी शाही मशिदीने ४९ हजार मेगा पिक्सलचे हे फोटो जारी केले आहेत. फोटो काढण्यासाठी आणि ते डेव्हलप करण्यासाठी ५० तासांपेक्षा जास्त वेळ लागला असून खरा फोटो बनविण्यासाठी एकूण १०५० फोटोंचा मिलाप केला गेला. यातील प्रत्येक फोटो १६० गिगाबाईटचा होता असे सांगितले जात आहे. फक्त फोटो काढण्याचे काम सात तासांपेक्षा जास्त वेळ सुरु होते.

युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड मधील इस्लामिक अध्ययन केंद्रातील संशोधक अफिफी अल अकिती यांनी हे फोटो पाहून प्रत्यक्षात हा पत्थर काळा नसल्याचे दिसते आहे असे म्हटले आहे. या पत्थरचा कण अन कण डिजिटल पद्धतीने मोठा केला गेला आहे. या पवित्र दगडाला अल- हजर- अल- आस्वाद म्हणजेच काळा पत्थर असे म्हटले जाते. मशिदीच्या पूर्व भागात चांदीच्या कोंदणात तो बसविला गेला असून या दगडाचे चुंबन घेण्याची प्रथा आहे. अर्थात प्रचंड गर्दीमुळे फार थोड्या लोकांना आणि काही काझीना ही संधी मिळते.

स्वर्गातून जेव्हा आदम पृथ्वीवर ढकलला गेला तेव्हा त्याला हा पांढरा दगड दिला गेला होता असा समज आहे. त्यावेळी तो पांढरा असला तरी जगातील लाखो यात्रेकरूंनी त्याचे चुंबन घेतल्यामुळे त्यांची पापे पचवून तो काळा बनला असे म्हटले जाते