ट्विटरवरून सस्पेंड कंगनाचे देशी ‘कु’ वर स्वागत

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत सोशल मीडियावर नेहमीच वादग्रस्त विधाने करून चर्चेत असते. पण अशाच वादग्रस्त विधानांमुळे ट्विटरने कंगणाचे अकौंट कायम स्वरूपी सस्पेंड केले असल्याची बातमी येते न येते तोच देशी अॅप ‘कु’ वर कंगणाचे स्वागत केले गेले आहे.

कु च्या संस्थापकांनी मंगळवारी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कंगनाच्या पहिल्या कु पोस्टचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे. यात कंगनाने कु आपल्या स्वतःच्या घरासारखे आहे तर बाकीचे भाड्याच्या घरासारखे आहेत असे म्हटले आहे. ट्विटरने कंगनाचे अकौंट सस्पेंड करताना तिने नियमांचे उल्लंघन केल्याचे कारण दिले आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालानंतर कंगनाने अनेक वादग्रस्त विधाने केली असून त्याविरोधात तिच्या विरुद्ध कोलकाता पोलिसांनी केस दाखल केली आहे. कंगनाने प. बंगाल मध्ये बांग्लादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांची मोठी संख्या असल्याने हिंदू बहुमतात नाहीत असे म्हटले होते. आकडेवारी नुसार मुस्लीम गरीब आणि वंचित आहेत हे चांगले आहे. दुसरे काश्मीर बनते आहे. असेही विधान कंगनाने केले आहे. त्या विरोधात बंगाली लोकांच्या भावना दुखावल्या आणि त्यांचा अपमान केला अशी केस कंगना विरुद्ध दाखल झाली आहे.