दीपिका पदुकोण सह सर्व कुटुंब करोनाच्या विळख्यात

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण कोविड १९ संक्रमित झाली असल्याचे वृत्त आहे. तिच्या तब्येतीविषयी अधिक माहिती मिळू शकलेली नाही. दीपिकाचे वडील प्रसिद्ध बॅडमिंटन पटू प्रकाश पदुकोण, आई उजाला आणि बहिण अनिशा हे सर्व जण करोना पोझिटिव्ह आहेत. गेल्या महिन्यात दीपिका, पती रणवीर सह काही दिवस कुटुंबांसोबत राहण्यासाठी बंगलोर येथे गेली आहे.

प्रकाश पदुकोण यांचे मित्र आणि पदुकोण बॅडमिंटन अकादमीचे संचालक विमल कुमार म्हणाले, १० दिवसांपूर्वी प्रकाश,. त्यांची पत्नी आणि धाकटी मुलगी याना करोनाची लक्षणे दिसल्यावर त्यांची टेस्ट केली गेली तेव्हा त्या सगळ्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. सात दिवसानंतर सुद्धा प्रकाश यांचा ताप कमी न झाल्याने त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल केले गेले असून आता त्यांची तब्येत बरी आहे. दीपिकाची आई आणि बहिण घरी आयसोलेशन मध्ये आहेत.

विशेष म्हणजे दीपिकाने नुकतेच सध्याच्या भयावह करोना परिस्थितीत मानसिक स्वास्थ्य जपणे कसे आवश्यक आहे यावर भाष्य केले होते आणि या काळात भावनेच्या भरात वाहून न जाता मनोबल खंबीर ठेवणे गरजेचे आहे असे सांगितले होते. आता तिला स्वतःलाच करोनाला सामोरे जावे लागत आहे.