गुगलची मल्टीस्कीन टोन्ड हँडशेक इमोजी लवकरच येणार

लिंगभेट आणि वर्णद्वेष संपविण्याच्या उद्देशाने गुगलने नवीन इमोजी लाँच करण्याची तयारी केली असून ही मल्टीस्कीन टोन्ड हँडशेक इमोजी २०२२ मध्ये युजर्स साठी उपलब्ध होईल. यात त्वचेच्या रंगाच्या विविध शेड साठी २५ पर्याय दिले जात आहेत.

या संदर्भात गुगलच्या इमोजी क्रिएटीव्ह डायरेक्टर जेनिफर डॅनियल यांनी सांगितले, आपल्या आयुष्यात या प्रकारचा बदल आवश्यक आहे. यामुळे आपले जीवन बदलू शकणार आहे. काही तांत्रिक अडचणी आणि करोना मुळे मल्टीस्कीन टोन्ड हँडशेक इमोजी रिलीज व्हायला वेळ लागला आहे. पण लवकरच या इमोजी रिलीज केल्या जात आहेत. २०१९ मध्ये याचे काम सुरु झाले होते. पण मल्टीस्कीन टोन्ड तयार करायला दोन वर्षे वेळ लागतो. सामान्य वन टोन हँडशेक इमोजी यापूर्वीच आली आहे पण दोन वेगळ्या टोन मधील नवी इमोजी करताना वेगळ्या टोनचे दोन वेगळे हात तयार करावे लागतात, याला बायनरी असे म्हटले जाते.

वास्तविक या इमोजी २०२१ मध्येच रिलीज केल्या जाणार होत्या पण करोना संकटामुळे सर्व युनिकोड तयार व्हायला उशीर झाला असे समजते.