अँड्रॉइड आणि आयओएस युजर्ससाठी व्हॉट्सअॅप आणत आहे शानदार फिचर


नवी दिल्ली – लवकरच एक नवीन फिचर लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपवर येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून व्हॉट्सअॅपकडून व्हॉइस मेसेजच्या प्लेबॅक स्पीड फिचरवर काम सुरू होते.

व्हॉट्सअॅप युजरला Voice Messages Playback Speed Feature या नवीन फिचरद्वारे कोणताही व्हॉइस मेसेज वेगाने किंवा हळू स्पीडने ऐकता येईल. युजर्स या फीचरअंतर्गत कोणत्याही व्हॉइस मेसेजसाठी तीन विविध स्पीड निवडू शकतो. यासाठी ऑडिओ प्लेबॅक स्पीड लेवल 1x, 1.5x आणि 2x असे तीन पर्याय मिळतील.

त्याचबरोबर कोणताही व्हॉइस मेसेज पाठवण्याआधी तो ऐकता येणार आहे. म्हणजेच व्हॉइस मेसेज पाठवण्याआधी, तो युजरला ऐकताही येणार आहे. आतापर्यंत व्हॉइस मेसेज रेकॉर्ड होताच आपोआप सेंड व्हायचा, पण आता सेंड करण्याआधी युजरला आपला मेसेज ऐकता येणार आहे. पण या फिचरवर सध्या टेस्टिंग सुरू आहे. टेस्टिंग पूर्ण झाल्यावर लवकरच कंपनीकडून अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी हे फिचर रोलआउट केले जाईल.