कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सकडून केंद्र सरकारला शिफारशी


नवी दिल्ली – सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका देशाला बसला असून कोरोनाबाधितांच्या संख्येने गाठलेले उच्चांक केंद्र सरकारसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. दरम्यान कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचीही संख्या वाढत असल्याने कोरोनाचा फैलाव रोखण्याचे केंद्र सरकारसमोर मोठे आव्हान आहे. देशात या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन लागणार का ? अशी चर्चादेखील रंगली आहे. दरम्यान कोरोनाचा देशातील वाढता फैलाव रोखण्यासाठी द लॅन्सेट इंडिया टास्क फोर्सने केंद्र सरकारला काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत.

केंद्र सरकारला काही शिफारशी टास्क फोर्सने केल्या आहेत. यामध्ये लॉकडाऊनचाही उल्लेख आहे. केंद्राला सूचनांचा स्वीकार करताना लॉकडाऊनच्या चर्रेच्या पुढे यावर विचार केला पाहिजे, असे टास्क फोर्सने म्हटले आहे. केंद्राला टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांनध्ये दैनंदिन रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण, दैनंदिन चाचण्यांची संख्या, आयसीयी बेड्स वापरण्याचे प्रमाण यांचा उल्लेख केला आहे.

टास्क फोर्सने केंद्र सरकारला आर्थिक परिणाम लक्षात घेत सल्लामसलत करुन सर्व पावले उचलली पाहिजेत अशी शिफारस केली आहे. यावेळी त्यांनी सर्वाधिक फटका बसणाऱ्यांसाठी योग्य कार्यक्रम आणि सुरक्षा जाळे निर्माण होईल याची खात्री करण्याचाही सल्ला दिला आहे.

संपूर्ण लॉकडाऊनला टास्क फोर्सने विरोध केला आहे. यावर संपूर्ण लॉकडाऊन हा एकमेव पर्याय नसून अनेक गोष्टी करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. योग्य ठिकाणी लक्ष्य देत आणि समनव्य साधत परिस्थितीला हाताळणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे. त्या दृष्टीने उचलण्यात येणारी पावले स्थानिक स्थितीच्या आधारे वेगळी असू शकतात. ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे, तिथे अनेक निर्बंध आणावे लागतील. तर जिथे संख्या कमी आहे, तिथे कदाचित योग्य निर्बंध असतील, असे टास्क फोर्सने म्हटले आहे. संपूर्ण लॉकडाऊनची मागणी केली जात असली तरी टास्क फोर्सने हा पर्याय नसल्याचे सांगितले आहे. तसेच देशाची झोनमध्ये विभागणी करण्याचा सल्ला देखील दिला आहे. यामध्ये कमी, मध्यम आणि हॉटस्पॉट्स अशी विभागणी असेल.