गेल्या 24 तासांत देशात तीन लाख 732 रुग्ण झाले कोरोनामुक्त


नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भयावह प्रादुर्भाव भारतात पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक झपाट्याने वाढ होत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात गेल्या 24 तासांत तीन लाख 68 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात झाली आहे. तर 3 हजार 417 रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. त्याचबरोबर दिलासादायक अशी बाब म्हणजे तीन लाख 732 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.

रविवारच्या तुलनेत आज कोरोनाबाधितांची संख्या कमी दिसून आली आहे. रविवारी भारतात 3,92,488 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. तर 3689 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तसेच 3,07,865 लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.

देशात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली होती. देशभरात 30 एप्रिलपर्यंत 15 कोटी 49 लाख 89 हजार 635 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर काल 27 लाख 44 हजार 485 लसीचे डोस देण्यात आले आहेत. 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व लोकांच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला होता. आता 1 मेपासून देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे.

दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढत आहे. काल दिवसभरात तब्बल 56 हजार 647 रुग्णांचे निदान झाले. तर 51, 356 कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत एकूण 39,81,658 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.31% एवढे झाले आहे.

तर राज्यात आज 62,919 नवीन कोरोनाबाधितांचे निदान झाले. दरम्यान काल 669 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला. सध्या राज्यातील मत्यूदर 1.49% एवढा आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 2,76,52,758 प्रयोगशाळा नमुन्याांपैकी 47,22,401 (17.08 टक्के)नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 39,96,946 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. तर 27,735 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.