गुगलच्या सीईओंनी भारतातील कोरोना परिस्थितीवर वर्तवले भयावह भाकीत


नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यातच एकीकडे कोरोनाबाधितांची सुविधां अभावी होणारी हेळसांड त्यामुळे तर आरोग्य यंत्रणेवर अजूनच ताण पडताना दिसत आहे. तर दूसरीकडे ऑक्सिजन आणि वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा ही तर वेगळीच समस्या आहे. रुग्णालयातील आयसीयूमध्ये कोरोनाबाधितांना बेड मिळणे कठीण झाले आहे. त्यातच आता भारताला इशारा देत कोरोनाबाबत गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भाकीत वर्तवले आहे. त्यांनी अद्याप वाईट स्थिती येईल असे भाकीत सीएनएन या वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत वर्तवले आहे.

कोरोना स्थितीचा वाईट काळ भारतात येणे अजून बाकी आहे. कोरोनामुळे भारताची सध्या बिकट अवस्था आहे. भारताला अमेरिकेकडून मदत मिळत असल्याची चर्चा आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन भारतातील स्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले. लोकांना खरी आणि योग्य माहिती देण्यावर आमचे लक्ष असल्यामुळे लोकांना मदत मिळेल, असे त्यांनी गुगल कंपनी भारतासाठी काय करते? या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

भारतासाठी १३५ कोटींच्या मदतीची घोषणा माहिती तंत्रज्ञान श्रेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या गुगलने केली आहे. ही घोषणा गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भारतीय वंशाचे सुंदर पिचाई यांनी केली आहे. कोरोनाबाधितांची संख्या दुसऱ्या लाटेत वाढत असल्याबद्दलही पिचाई यांनी चिंता व्यक्त केली आहे.

भारताला मदत करण्यासंदर्भातील आश्वासन अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, सौदी अरेबिया यासारख्या अनेक देशांनी दिले आहे. भारतामधील लस निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करण्यासाठी मागील अनेक आठवड्यांपासून अडवणूक करणाऱ्या अमेरेकिनेही भारतात सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. ब्रिटननेही भारताच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत सोबत असल्याचे आणि शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन भारतातील उच्चायुक्तांच्या माध्यमातून दिलं आहे. जगभरातील दहा लहान मोठ्या देशांनी भारताला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.