लसीकरणाआधी आणि नंतर काय करावे याची तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती


मुंबई : स्वतःचा कोरोनापासून बचाव करण्याचा कोरोना नियमांचे आवर्जुन पालन करण्यासोबत कोरोना लसीकरण करणे हेच उपाय असून. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लसीकरण मोहिम अधिक वेगाने देशात सुरु आहे. 1मेपासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे.

याचदरम्यान लसीकरणाबाबत सर्वांच्या मनात अनेक प्रश्न गोंधळ निर्माण करतात. अनेकजणांना लसीकरणानंतर काय करावे आणि काय करु नये, यांसारख्या प्रश्नांची उत्तर न मिळाल्यामुळे लसीकरण करुन घेणे टाळतात. अशातच अनेकांच्या मनातील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, लसीकरण केल्यानंतर धुम्रपान करु शकतो का? तज्ज्ञांचे यासंदर्भात मत काय? लसीकरणानंतर धुम्रपान करणे योग्य आहे? यांसारख्या प्रश्नांचे निरसन होणे अत्यंत आवश्यक आहे.

याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्ती धुम्रपान करतात, त्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यासाठी आवश्यक आहे की, जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत लवकरात लवकर कोरोना लस घ्यावी. धुम्रपान केल्याने फुफ्फुसांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. तसेच सतत धुम्रपान केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो. तसेच श्वसनाचे विकारा जडण्याचाही धोका वाढतो. अनेक संशोधनातून निष्कर्ष काढण्यात आला आहे की, धुम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

सोशल मीडियाच्या माध्यमातून लसीकरणानंतर काय करावं? काय करु नये? यांदर्भातील काही सूचना न्यूट्रिशनिस्ट डॉ. विशाखा यांनी दिल्या आहेत. त्यांनी सांगितले की, कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर नागरिकांनी धुम्रपाने टाळलं पाहिजे, कारण यामुळे लसीकरणामुळे शरीरात तयार होणाऱ्या अँटिबॉडीजचा रिस्पॉन्स कमी होतो. जर एखादी व्यक्ती लसीचा डोस घेणार असेल तर त्या व्यक्तीने काय करावं? यासंदर्भात सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर करुन डॉक्टरांनी माहिती दिली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार,

  • लस घेतलेल्या व्यक्तीने पूर्ण झोप घेणे अत्यंत गरजेचे असून रात्री सहा तासांची झोप घेणे गरजेचे आहे.
  • तणाव कमी करण्यासाठी लोकांनी श्वसनाचे व्यायाम करणंही अत्यंत गरजेचे आहे.
  • केवळ धुम्रपानच नाहीतर मद्यपानही लसीकरणाविरोधात रोगप्रतिकार शक्ती कमी करण्यास कारण ठरु शकते.
  • अशाप्रकारे लसीचा डोस घेण्यापूर्वी तीन दिवस आधी मद्यपान करणे टाळावे.