टोक्यो ऑलिम्पिक मशाल रिले मार्गात बदल

जपान मध्येही करोनाचा कहर असल्याने २५ एप्रिल पासून आणीबाणी लागू केली गेली आहे. दरम्यान २३ जुलै पासून सुरु होणाऱ्या ऑलिम्पिकच्या मशाल रिलेचा मार्ग बदलला गेला आहे. या आठवड्याअखेर ही रिले दक्षिण द्वीप ओकिनावा म्हणून जाणार होती पण या प्रदेशातील मियाकोजीया मधील नागरिकांची आपल्या बेटावर बाहेरचे कुणी येऊ नये अशी इच्छा असल्याने या गावातून मशाल रिले जाणार नाही.

गेल्या सहा आठवड्यापासून ही मशाल रिले सुरु असून त्यात १० हजार धावपटू सहभागी आहेत. करोना मुळे गेल्या वर्षी टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या मात्र या वर्षी त्या घेण्याचा निर्णय घेतला गेला होता. मात्र अजूनही या स्पर्धांवर अनिश्चिततेचे सावट आहे.

टोक्यो येथे सहा दिवस जलतरण परीक्षण स्पर्धेत सामील होण्यासाठी ४६ देशातील २२५ खेळाडू आले आहेत. त्यात इजिप्त संघाचे प्रशिक्षक कोविड पोझिटिव्ह असल्याचे दिसून आले मात्र बाकी कुणीही कोविड संक्रमित नसल्याचे सांगितले गेले आहे. हे खेळाडू कुठे राहणार, त्यांचे विलगीकरण कसे केले जाणार या बाबतचे नियम स्पष्ट नसल्याने थोडा गोंधळ उडाल्याचे समजते. २५ एप्रिल पासून आणीबाणी लागू झाल्याने अनेक ठिकाणी रेस्टॉरंटस, डिपार्टमेन्टल स्टोर्स बंद आहेत.