जगातली महागडी नंबर प्लेट आणि मोबाईल नंबर

जगातील महागडी वाहन नंबर प्लेट यावर अनेकदा चर्चा होताना ऐकायला येते. दुबई येथे नुकत्याच झालेल्या चॅरिटी लिलावात एका सिंगल डिजीट नंबर प्लेट ने वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविले आहे. एए ९ नंबरची ही नंबर प्लेट चक्क ३८ दशलक्ष दिरहाम म्हणजे ७६ कोटी रुपयांना विकली गेली. या लिलावात सिंगल डिजीट, डबल डिजीट वाहन नंबर प्लेट बरोबर फॅन्सी मोबाईल नंबर्सचाही लिलाव करण्यात आला.

दुबई स्पोर्ट्स कौन्सिल चेअरमन मोहम्मद बिन रशीद अल मकदूम ग्लोबल इनिशियेटीव्हने दुबई रस्ते परिवहन प्राधिकरणाच्या सहकार्याने या लिलावाचे आयोजन केले होते. त्यात ०५६ ९९९ ९९९९ सारखे मोबाईल नंबर ६ कोटी रुपयांना विकले गेले. या लिलावात जमलेला पैसा रमजान काळात ३० देशातील व्यक्ती, कुटुंबाना भोजन पार्सल देण्यासाठी वापरला जाणार आहे. लिलाव सुरु होण्यापूर्वीच दोन दानशूर व्यक्तींनी ५,५०,००० दिरहाम दान म्हणून दिले होते. १० दिवसात दान मिळालेली रक्कम १०० दशलक्ष दिरहाम वर पोहोचली असल्याचे सांगितले जात आहे.