पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का; भाजपचे समाधान आवताडे विजयी


पंढरपूर – आज ५ राज्यांच्या निकालांची देशात चर्चा आणि उत्सुकता आहे. पण, त्यासोबतच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या निकालाची देखील चर्चा आहे. सकाळी ८ वाजल्यापासून पंढरपुरात मतमोजणीला सुरुवात झाली. नियमांप्रमाणे आधी पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली. या मतदारसंघाचा आकार आणि एकूण मतदारांची संख्या पाहाता दुपारपर्यंत पंढरपूर पोटनिवडणुकीचा निकाल हाती येणे अपेक्षित होत त्यानुसार निकाल जाहिर करण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे विजयी झाले असून राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

भाजपच्या समाधान आवताडे यांना एकूण 109450 मते पडली आहेत, ज्यात 107774 ईव्हीएम मतांचा, तर 1676 पोस्टल मतांचा समावेश आहे. तर दूसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांना एकूण 107717 मते पडली आहेत, तर 104271 ईव्हीएम मते आणि 1446 पोस्टल मते पडली आहेत. त्यामुळे एकूण 3733 मतांच्या फरकाने समाधान अवताडे विजयी झाले आहेत.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून समाधान अवताडे आणि महाविकासआघाडीकडून भगीरथ भालके यांच्यात थेट सामना पाहायला मिळत होता. भाजपच्या समाधान आवताडे यांनी २५ व्या फेरीअखेर ६ हजार ३३४ मतांनी आघाडी घेतली होती. तर सतराव्या फेरीपर्यंत आवताडेंना ७५ हजार ७३ मते मिळाली तर भालकेंना एकूण ६८ हजार ७३९ मते मिळाली होती.