पंढरपूरमध्ये तुम्हाला घरात शिरून भाजपने ठोकले – निलेश राणे


मुंबई – भाजपला पराभूत करत ममता बॅनर्जीं यांनी संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत मैदान मारले आहे. पण इकडे महाराष्ट्रात झालेल्या पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे उमेदवार भगिरथ भालके यांचा पराभव केला आहेत. दरम्यान, या विजयानंतर भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर बोचरी टीका केली आहे.


महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निलेश राणे यांनी ट्विट करून निशाणा साधला आहे. आपल्या पहिल्या ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले की, त्या अजित पवारांना शोधा.. नेहमी सांगतात तीन पक्ष एकत्र आल्यावर कोणाची मायची अवलाद हरवू शकत नाही. तुमच्या घरात शिरून बीजेपी ने तुम्हाला ठोकलय. ममता बॅनर्जींचं कसलं गुणगान गाताय?? बंगाल मध्ये तुमच्या तीन पक्षाच्या नावाचा कुत्रा सुद्धा नाही. संज्या तू स्वतः कधी निवडून येणार ते सांग? असा सवालही निलेश राणे यांनी केला.


त्याचबरोबर त्यांनी पश्चिम बंगालच्या निकालांसंदर्भातही एक ट्विट केले आहे, त्यात ते म्हणतात की, ममता बॅनर्जी जिंकल्या खऱ्या पण कशा जिंकल्या हे विसरून चालणार नाही. कृष्णकथा आणि चंडीपाठ व्यासपिठावर त्यांना म्हणावे लागले. ममतादीदींना हिंदूंचा आसरा घ्यावाच लागला. लेफ्ट वाल्यांशी किंवा काँग्रेसशी लढताना त्यांना कधीही हिंदू आठवला नव्हता, तो पहिल्यांदा आठवला. हे काय कमी आहे.