कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी पुढे सरसावला फरहान अख्तर; पुरवत आहे ऑक्सिजन, रुग्णवाहिका आणि अन्न


देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली असून अनेक बॉलिवूड कलाकारांनी यावेळी पुढे येऊन गरजूंना मदत करण्याचे ठरवले. आता बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने त्याची एक्सेल एंटरटेनमेंट कंपनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कोणत्या स्वयंसेवी संस्था आर्थिक मदत करत आहे हे सांगितले आहे. या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गरजू रुग्णांसाठी सुविधा पुरवण्याचे काम करणार असल्याचे फरहानने सांगितले आहे.


सोशल मीडियावर फरहान अख्तरचे हे ट्वीट प्रचंड व्हायरल झाले आहे. त्याने आपल्या ट्वीटमध्ये स्वयंसेवी संस्थांची एक संपूर्ण लिस्ट दिली आहे. आतापर्यंत कोरोना विरुद्ध लढ्यात देणगी दिलेल्या सगळ्या संस्थांची नावे शेअर करत आहे. ऑक्सिजन ते रुग्णवाहिकांपासून अन्न या सगळ्या गरजेच्या वस्तू पुरवण्याचे अविश्वसनीय काम या संस्था करत आहेत. प्रत्येकाने थोडी मदत करण्यासाठी स्वत:ला प्रोस्ताहित करा. प्रत्येक रुपयाला महत्त्व आहे. जय हिंद, असे ट्वीट फरहानने केले आहे.


हेमकुंट फाउंडेशन, डॉक्टर फॉर यू, मिशन वायु, रसोई ऑन व्हील्स, गिव इंडिया, होप वेलफेयर ट्रस्ट, एसबीएस फाउंडेशन, सत्यार्थ सोशियो या काही संस्था आहेत ज्या रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुण देण्यासोबतच क्वारंटाइन रुग्णांसाठी भोजन आणि कोरोनाशी झुंजणाऱ्या रुग्णांना औषधे उपलब्ध करून देत आहेत.