श्रीमंत व्यक्ती जिवलगांना देतात अशाही गिफ्ट


श्रीमंत लोक त्यांच्या मुलांना, बायकांना किवा अन्य जवळच्या लोकांना काय गिफ्ट देत असतील असा विचार आपल्या मनात कधीतरी येतोच. आता मुकेश अंबानींनीच पहा, त्यांच्या पत्नीला वाढदिवसाची भेट म्हणून चक्क भलेथोरले विमान भेट दिले. भेटी देण्याची ही प्रथा तशी प्राचीन आहे. आपल्या देशात ताजमहाल हेही शहाजनहानच्या मुमताजवरील प्रेमाचे प्रतीक म्हणूनच प्रसिद्ध आहे. अशाच या कांही अजब गिफ्ट


हॉलीवूडमधील लोकप्रिय कपल म्हणून अँजलिना जोली व ब्रॅड पिट यांची प्रसिद्धी होती. आता त्यांचा घटस्फोट झाला असला तरी ते एकत्र होते तेव्हा अँजेलिनाने ब्रॅडला अशाच काही मजेदार पण महागड्या गिफ्ट दिल्या होत्या. अँजलिनाला आगळ्या वेगळ्या गिफ्ट देण्याची खूप आवड. तिने एकदा पिटला २००८ साली सरप्राईज व्हॅलेंटाईन गिफ्ट म्हणून ऑलिव्हचे एक झाड भेट दिले. हे झाड २०० वर्षाचे जुने होते व त्याची किंमत होती १८५०० डॉलर्स. तसेच २०१२ साली तिने पिटला १६ लाख डॉलर्स खर्चून कॅलिफोर्नियातील एक धबधबा नाताळची भेट म्हणून दिला होता. तर एकदा इतकीच किंमत मोजून त्याचे आवडते हेलिकॉप्टर त्याला नजर केले होते.


रशियन टायकून अब्रोमोविच याने अल्बर्टो झिकामिटी याने बनविलेला प्रसिद्ध वॉकिंग मॅनचा पुतळा १०४ दशलक्ष डॉलर्सना खरेदी करून तो आपल्या पत्नीला भेट म्हणून दिला होता.


क्रिस ब्राऊनी याने आपल्या मुलीला नाताळची भेट म्हणून तिबेटी मस्टीफ कुत्र्याचे पिल्लू भेट दिले. या पिलाची किमत होती १५ लक्ष डॉलर्स.


सेसिल चब याने आपल्या बायकोला चक्क प्राचीन स्मारकच भेट म्हणून दिले होते. युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेले १९१५ सालचे स्टोनहेंज ही साईट १० हजार डॉलर्सला खरेदी करून त्याने दिली होती.

१९८१ मध्ये आबुधाबीचा शेख मोहम्मद याने मुलाच्या लग्नासाठी येणार्‍या पाहुण्यांची सोय करायची म्हणून १०.५ दशलक्ष डॉलर्स खर्चून २० हजार लोक बसू शकतील असे एक स्टेडियम खरेदी केले व नंतर ते त्याने मुलगा व सुनेला भेट म्हणून दिले.

हॉलीवूडचा चित्रपट निर्माता एरॉन स्पेलिंग्ज याने आपल्या मुलांना स्नो ख्रिसमसचा किंवा व्हाईट ख्रिसमसचा आनंद लुटता यावा म्हणून २० दशलक्ष डॉलर्स खर्चून लॉस एंजेलिस येथील त्याच्या घरात बर्फ पसरविला होता.


हॉलीवूड अभिनेता रिचर्ड बर्टन याने त्याची पत्नी व प्रसिद्ध अभिनेत्री एलिझाबेथ हिच्यासाठी क्विन मेरीचा एक मौल्यवान हार १९६९ साली करण्यात आलेल्या लिलावात खरेदी करून गिफ्ट दिला. या नेकलेसमध्ये सर्वात महागडा समजला जाणारा पेलेग्रिना मोती जडविलेला होता.

Leave a Comment