‘हा’ आहे जगातील सर्वात महाग बर्गर


सध्याच्या तरुणाईमध्ये फास्ट फूडची प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. त्यातच लहान मुलांनाही पिझ्झा, बर्गर यासारखे पदार्थ आवडू लागले आहेत. त्यात बर्गर म्हटले की अनेकांच्या जिभेला पाणी सुटते. बर्गर हा सामान्यतः ५० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत मिळतो आणि या किंमती सर्वसामान्यांना देखील परवडणाऱ्या आहेत. पण तुम्हाला जर कोणी सांगितले की एखाद्या बर्गरची किंमत चक्क ६३ हजार रुपये आहे, तर नक्कीच तुमचा विश्वास बसणार नाही. पण खरोखर या किंमतीत बर्गर विकला जाता आहे आणि तो जपानमधील एका शेफने तयार केला आहे.

जगातील सर्वात महाग बर्गरची विक्री जपानमधील टोकियो येथे एका रेस्टॉरंटमध्ये सुरु करण्यात आली आहे. किंमत ७०० पाऊंड म्हणजे ६३ हजार रुपये एवढी या बर्गरची आहे. हा बर्गर ओक डोर स्टीकहाऊस येथे काम करणाऱ्या शेफ पॅट्रीक शिमादा यांनी तयार केला आहे. प्रिन्स नारुहितो हे जपानचे नवे सम्राट म्हणून कार्यभार स्वीकारत असून त्याच्या सन्मानार्थ हा बर्गर बनविला गेला आहे.

केवळ जून २०१९ पर्यंतच या बर्गरची विक्री केली जाणार असून ‘गोल्डन जॉयंए बर्गर’ असे त्याचे नाव आहे. खास पदार्थांचा वापर हा बर्गर तयार करण्यासाठी करण्यात आल्यामुळे त्याची किंमत जास्त ठेवण्यात आली आहे. हा बर्गर तयार करण्यासाठी १ किलो पॅटी, वाग्यु बीफ स्लाईस, फॉसी ग्राल, ट्रफल, लेट्यूस, चेडर पनीर, टॉमॅटो आणि कांदा यांचा वापर करण्यात आला आहे. ६ इंच रुंद आणि १० इंद लांबी एवढा या बर्गरचा आकार आहे. सध्या हा बर्गर पाहायला आणि खरेदी करण्यासाठी खवय्यांची रांग लागली आहे. पण या बर्गरची जर खरेदी करायची असेल तर तीन दिवस आधीच अॅडव्हान्स बुकिंग करावी लागणार आहे.

Leave a Comment