या 12 इमेल्सला जास्त बळी पडतात लोक


आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा इंटरनेट हे अविभाज्य घटक बनले आहे, पण याच कारणामुळे अगदी सहजपणे आपण सायबर क्राईमच्या जाळ्यात अडकतो. ईमेल हे त्याचे सर्वात कमकुवत माध्यम असून, सर्वात जास्त लोक याच माध्यमातून धोकादायक लिंक आणि मालवेअरचे शिकार बनतात.

3.6 लाख ईमेलवर ‘बराक्युडा नेटवर्क्स’ या सायबर सिक्युरिटी संस्थेने रिसर्च केले. त्यांना ज्यात 12 अशा ईमेल सब्जेक्ट लाइन मिळाल्या ज्या जास्तीत जास्त मेलयुजर्स येतात. त्यात आपली सब्जेक्ट न वाचताच आलेल्या ईमेल उघडण्याची मानसिकता असते. सब्जेक्ट न वाचा किंवा मेल कुणी पाठवला आहे हे न पाहताच तो ओपन करण्याची चूक आपण करतो आणि हॅकर्स आपलं अकाऊंट हॅक करण्यात यशस्वी ठरतात. तर आम्ही आज तुम्हाला अशा कोणत्या ईमेल सब्जेक्ट लाईन्स आहेत ज्या तुमचा मेल हॅक करण्यासाठी हॅकर्स वापरतात याची माहिती देत आहोत.

बहुतेककरून आपल्या मेलवरच बँक अकाऊंट किंवा अन्य गोष्टींसंदर्भातील माहिती असते. तुम्हाला असा कोणता ईमेल जर आला असेल ज्याच्या सब्जेक्टमध्ये Request, Follow Up, Urgent/Important, Are you available?/Are you at your desk, Payment Status, Hello, Purchase, Invoice Due, Re:, Direct Deposit, Expenses, Payroll असा उल्लेख असेल, तर तुम्हाला याबाबत सावधता बाळगण्याची जास्त गरज आहे.

कारण तो ईमेल हा तुमचे मेल अकाऊंट हॅक करण्याच्या उद्देशाने पाठवलेला असू शकतो. तुमच्या वैयक्तिक माहितीला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, असा रिसर्चनंतर ‘बराक्युडा नेटवर्क्स’ सायबर सिक्युरिटी संस्थेने म्हटले आहे.

Leave a Comment