तुमची घोरण्याची सवय त्रासदायक ठरत असल्यास..


रात्री झोपल्यानंतर किंवा दुपारच्या वेळी डुलकी काढताना तुमच्या घोरण्याच्या सवयीने तुमच्या आसपासच्या लोकांची झोप उडविली आहे का? किंवा घरातील इतर मंडळींच्या घोरण्याच्या सवयीमुळे तुमची झोप अपुरी राहते आहे का? ही सवय घालविण्यासाठी, काही उपाय करता येतील. पण मुळात घोरणे कशामुळे सुरु होते, हे जाणून घेणे महत्वाचे आहे. या कारणांमधेच या समस्येवरील उपायही आहेत.

आर आपल्या शरीराला प्राणवायू पुरविणाऱ्या नलिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा असला, तर घश्यातून घोरल्याप्रमाणे आवाज येतात. हे आवाज येण्यामागे अनेक कारणे आहेत. जर तुमची झोप अपुरी होत सेल, किंवा तुमच्या झोपण्याच्या वेळा नियमित नसतील, तर जेव्हा झोप लागेल, तेव्हा तुमचे घोरणे सुरु होईल. त्यामुळे झोपण्याची वेळ नियमित असावी. गाढ झोप येण्याकरिता झोपण्यापूर्वी अर्धा तास आपला मोबाईल, टीव्ही इत्यादी उपकरणे बंद करावीत. मनावर ताण आणणारे विचार डोक्यातून काढून टाकण्याचा प्रयत्न करावा. जर झोपेच्या दोन ते तीन तास आधी मद्यपान केले असेल, तरी घोरणे उद्भवते. त्यामुळे झोपेच्या वेळेआधी मद्यपान करणे टाळावे.

जर दम्याचा त्रास होत असेल, किंवा सर्दी खोकला होऊन घसा खराब असेल, नाक बंद असेल, तरीही घोरणे उद्भवते. अश्या वेळी गरम पाण्याची वाफ घ्यावी, व गरम पाण्याच्या गुळण्या ही कराव्यात. त्यामुळे घोरणे कमी होते. आपली जीवनशैली उत्तम आहार, नियमित व्यायाम आणि शरीराला आवश्यक तेवढ्या विश्रांतीने परिपूर्ण असावी. खाण्यापिण्याच्या व विश्रांतीच्या वेळांचे काटेकोरपणे पालन करावे. मद्यपान आणि धूम्रपान झोपेच्या वेळेआधी करणे टाळावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment