पॅनसाठी अर्ज करताना शक्यतो ‘या’ चुका टाळा


मुंबई : आयकर परताव्याची प्रक्रिया सुरू झाली असून तुम्ही जर पहिल्यांदा इन्कम टॅक्स भरत असाल तर पॅन कार्ड आणि आधार कार्ड दोन्हींची तुम्हाला गरज लागेल. लोक अनेकदा आधार कार्ड बनवून घेतात पण पॅन कार्ड बनवत नाहीत. पॅन कार्ड बनवताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असून त्यादरम्यान होणाऱ्या चुकाही तुम्ही टाळल्या पाहिजेत.

तुम्ही पॅन कार्ड तयार करताना इन्कम टॅक्सच्या www.incometaxindia.gov या वेबसाइटवर जा. फॉर्म 49ए पॅन कार्डासाठी भरावा लागतो. हेच नियम भारताबाहेर राहणाऱ्यांसाठीही आहेत. अनेक जण फॉर्म 49 ए भरताना अनेक चुका करतात. त्यामुळे पॅन कार्डासाठी तुम्ही केलेला अर्ज रद्द होऊ शकतो. म्हणून काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

फॉर्म 49 ए भरताना तुमची सही बॉक्सच्या आत असायला हवी. बॉक्सच्या बाहेर ती जाता कामा नये. पॅन कार्ड बनवताना अर्जदाराच्या नावावर नसलेल्या घराच्या पत्त्याचा पुरावा कधीच सबमिट करू नका. दिलेल्या बाॅक्समध्ये सहीसोबत तारीख, पद, रँक वगैरे अनावश्यक माहिती भरू नका. पत्नी किंवा पतीचे नाव वडिलांच्या काॅलममध्ये लिहू नका. तुमचे नाव संक्षिप्त लिहा. तुमच्याकडे आधी एक पॅन कार्ड असेल तर दुसऱ्यासाठी अजिबात अर्ज करू नका. दोन पॅन कार्ड बाळगणे गुन्हा आहे. अर्ज करताना फॉर्म 49 ए मध्ये पूर्ण घरचा पत्ता लिहा. पत्त्याच्या काॅलममध्ये कधीही पिन कोड चुकीचा लिहू नका. पिन कोडबरोबर फॉर्म 49 एमध्ये अचूक फोन नंबर किंवा ई मेल आयडी लिहावा लागेल. फॉर्म 49 ए मध्ये कधीही ओव्हरराईट करू नका. महत्त्वाचं म्हणजे फॉर्मवर तुमचा फोटो पिन किंवा स्टेपल करू नका.

Leave a Comment