मे महिन्यात भारतीय बाजारात येत आहेत हे स्मार्टफोन

भारतीय स्मार्टफोन बाजरासाठी मे महिना खास ठरणार आहे. या महिन्यात अनेक नामवंत कंपन्या त्यांचे फाईव जी स्मार्टफोन बाजारात आणत आहेत. त्यात सॅमसंग, गुगल, मोटो जी अश्या दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे.

गुगल प्रथमच त्यांचा मेड इन इंडिया पिक्सल फाईव्ह जी फोन मे मध्ये भारतात लाँच करणार असून त्याचे एकच व्हेरीयंट असेल. या फोनला ६.५ इंची ओलेड डिस्प्ले, ड्युअल कॅमेरा फ्लॅश सह असेल. त्याची किमंत साधारण ४० हजार रुपयांच्या दरम्यान असेल असे समजते.

मोटो जी १०० मे महिन्यातच भारतीय बाजारात दाखल होणार असून त्याचीही किंमत साधारण ४० हजार दरम्यान असेल. या फोनला ६.७ इंची आयपीएस एलसीडी डिस्प्ले, ८ जीबी रॅम, २५६ जीबी स्टोरेज, स्नॅपड्रॅगन ८७० प्रोसेसर, चार रिअर कॅमेरा सेटअप आणि सेल्फी साठी ड्युअल कॅमेरा असेल असे समजते.

सॅमसंग गॅलेक्सी ५२ फाईव्ह जी याच महिन्यात लाँच केला जात आहे. या फोनला सेल्फी साठी स्क्रीन टॉप राईट साईडला पंचहोल कटऔट असेल. त्याचबरोबर पोको एफ ३ जिटी  भारतात एफ ३ जीटी नावाने आणला जात असून एफ सिरीजचा हा फोन चीन मध्ये अगोदरच बाजारात आला आहे. त्याला ६.६७ इंची डिस्प्ले आणि १२ जीबी रॅम दिली गेली आहे. २५६ जीबी स्टोरेज, ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असून हा फाईव्ह जी फोन आहे.

वन प्लस नॉर्ड एन २० स्मार्टफोन मे मधेच भारतीय बाजारात दाखल होत आहे. त्याला ६.४९ इंची डिस्प्ले आणि रिअर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे असे समजते.