या अवाढव्य बटाट्यात एक रात्र राहण्यासाठी लोक मोजत आहेत २४७ डॉलर


बटाटा हा आपल्यापैकी प्रत्येकाचा आवडता. बटाट्याची भाजी, वडा, भजी, वेफर आपण नेहमीच आवडीने खातो. पण काही लोकांनी बटाट्याची जगभरातील लोकप्रियता पाहता एक भन्नाट शक्कल लढवली आहे. एक विशाल ‘बटाटा’ अमेरिकेतील इदाहोमध्ये असून लोक ज्यात एक रात्र राहण्यासाठी २०० डॉलर म्हणजेच १४ हजार रुपये खर्च करत आहेत. एखाद्या लक्झुरिअस हॉटेलसारखा हा ‘बटाटा’ आतून आहे.

यासंदर्भातील वृत्त Airbnb या संकेतस्थळाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, या हॉटेलचे बुकिंग तुम्ही देखील करु शकता. सहा टनाचा हा बटाटा असून स्टील, प्लाटर आणि कॉंक्रिटपासून या बटाट्याची निर्मिती करण्यात आली आहे. या ‘बटाट्यात’ एकदा शिरल्यावर तुम्ही सुंदरता बघुन हैराण व्हाल. दोन लोक या ‘बटाट्यात’ आरामात राहू शकतात. म्हणजे येथे खास व्यक्तीसोबत जाऊ शकतात. लोकांना या ‘बटाट्यात’ एक छोटे बाथरुम, किचन, आग पेटवण्यासाठी जागा आहे. तसेच यात एअर कंडिशनरही लावण्यात आला आहे.

तसे आपण बाजारात बटाटे घ्यायला गेलो तर फार जास्त पैसे त्यासाठी मोजावे लागत नाही, पण ‘बटाटा’ हॉटेलमध्ये एक रात्र राहणे चांगलेच महागात पडू शकते. येथे एक रात्र राहण्यासाठी तुम्हाला २०० डॉलर एवढी रक्कम मोजावी लागणार आहे. तुम्हाला त्याचबरोबर आणखी ३१ डॉलर सर्व्हिस टॅक्स आणि १६ डॉलर ऑक्यूपेंसी टॅक्स द्यावा लागेल. एकूण २४७ डॉलर म्हणजेच १८००० हजार रुपये तुम्हाला मोजावे लागतील.

Leave a Comment