देशातील या बाजारात 500 रूपयांत मिळतात ब्रॅंडेड शूज


नवी दिल्ली- तुम्ही जर ट्रेंडी आणि स्टायलिश बुटांचे शौकिन असाल, तर तुमच्यासाठी आम्ही देशातील काही निवडक शुज बाजारांबद्दल सांगणार आहोत. याठिकाणी तुम्ही स्वस्त दरात शुज खरेदी करू शकता. भारतातील या बाजारांमध्ये बुट आणि चप्पल इतर रिटेल मार्केट्सच्या तुलनेत 30-40 टक्के कमी किंमतीत मिळतात. तूम्ही स्वस्त दरात खालील मार्केट्समध्ये खरेदी करू शकता.

बुटांचे होलसेल मार्केट मध्य मुंबईतील कुर्ला स्टेशनच्या ठीक समोर असून हे ठिकाण सामान्य नागरिकांसाठी चप्पल आणि बुट घेण्यासाठी सर्वात चांगले माफक आहे. हा परिसर कुर्ला भागात असणाऱ्या या मार्केटच्या नावानेच ओळखला जातो. त्याचबरोबर परदेशी पर्यटकांसाठीही कुर्ला शुज मार्केट मुख्य शॉपिंग स्पॉट बनले आहे. सगळ्या प्रकारचे शूज कुर्ला शू मार्केटमध्ये मिळतात. स्थानिक लोकांसोबतच पर्यटकामध्ये हे मार्केट लोकप्रिय आहे. मुंबईच्या अनेक भागातून आलेले पर्यटक सुद्धा या बाजारात शॉपिंग करण्यासाठी येतात.

या बाजारात भरपूर दुकाने आहेत, पाहिजे तसे शूज येथे तूम्हाला मिळतात. आपल्याला ब्रॅंडेड शूज देखील या ठिकाणी कमी दरात मिळू शकतात. आपल्याला प्रत्येक ब्रॅंडचे बुट कुर्ला शूज मार्केटमध्ये मिळतील,जसे की पूमा, नाइकी, अदिदास आणि अनेक ब्रॅंडचे शुज मिळतील. पर्यटकांना हीच गोष्ट आकर्षित करते. लग्नासाठी डिझायनर शूज या बाजारात मिळतात. जेथे तूम्हाला मोठ्या दुकानामध्ये बुट 2,000 रूपयांत मिळतात ते या बाजारात 500-800 रूपयांमध्ये मिळतील.

कमी किंमतीत फुटवेअर खरेदी करण्यासाठी सरोजिनी नगर आणि चांदनी चौकातील मार्केट बल्लीमरानमध्ये चांगले पर्याय मिळतील. या बाजारात किंमत बाकी रिटेल मार्केटच्या तूलनेत 30-40 टक्के कमी असतात. बल्लीमरान होलसेल मार्केट आहे तर सरोजिनी मार्केट रिटेल मार्केट आहे. पण हे अन्य मार्केटच्या तुलनेत स्वस्त आहे. मोठ्यापासून ते लहान मुलांपर्यंत येथे फुटवेअर मिळतील. तिकडे पुराणी दिल्लीच्या जामा मस्जिद जवळ लागणाऱ्या मार्केटमध्ये आपल्याला ट्रेंडी व स्टायलिश बुट फक्त 50 रूपयांत मिळतील. हे सर्व बुट नवे असतात. येथे तूम्ही महिला आणि पुरूष दोघांसाठी माफक दरात बुटांची खरेदी करू शकता. आपण सदर बाजारात असलेल्या चप्पल वाली गलीमध्ये स्वस्त दरात बुट खरेदी करू शकता. मुलांपासून ते वृद्धापर्यंतचे बुट या बाजारात चप्पल चांगल्या दरात मिळतील. येथे अन्य मार्केटच्या तुलनेत 50 टक्के किंमत कमी असते.

Leave a Comment