देशात काल दिवसभरात 2,69,507 रुग्णांची कोरोनावर मात


नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक नवनवे उच्चांक गाठत आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मृत्यूदरातही वाढ होत आहे. केंद्री. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 3,79,257 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 3645 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 2,69,507 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.

महाराष्ट्रात काल दिवसभरात 63,309 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 61,181 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 37,30,729 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.4 टक्के एवढे झाले आहे.

राज्यात काल सर्वाधिक 985 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,65,27,862 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 44,73,394 (16.86टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. राज्यात सध्या 42,03,547 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 31,159 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.