सॅमसंग गॅलेक्सी एम ४२, फाईव्ह जी फोन लाँच

सॅमसंगने त्यांच्या एम सिरीज मधील गॅलेक्सी एम ४२, फाईव्ह जी स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. दोन व्हेरीयंट मध्ये हा फोन असून त्याची विक्री १ मे पासून अमेझोन आणि कंपनीच्या अधिकृत साईटवर सुरु होणार आहे.

या फोनला स्नॅपड्रॅगन ७५० प्रोसेसर, ५ हजार एमएएच फास्ट चार्जिंग बॅटरी, अँड्राईड ११ ओएस दिली गेली आहे. ६ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅम अशी दोन व्हेरीयंट आहेत आणि दोन्हीसाठी इंटरनल स्टोरेज १२८ जीबी असून मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने ते वाढविता येणार आहे. पहिल्या व्हेरीयंट साठी इंट्रोडक्टरी ऑफर मध्ये २१९९९ रुपये मूळ किमतीऐवजी १९९९९ रुपयात फोन मिळणार आहे तर दुसऱ्यासाठी २३९९९ ऐवजी २१९९९ रुपये भरावे लागतील.

सॅमसंग गॅलेक्सी एम ४२, फाईव्ह जी साठी बॅक पॅनल ला क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. प्रायमरी कॅमेरा ४८ एमपीचा आहे. शिवाय ८ एमपीचे अल्ट्रा वाईड लेन्स, ५ एमपीचा डेफ्थ सेन्सर आणि ५ एमपीचे मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी साठी फ्रंटला २० एमपी कॅमेरा आहे. इनडिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर दिला गेला आहे.