१८+ लसीकरण, पहिल्या ३ तासात १ कोटी लोकांनी केले रजिस्ट्रेशन

देशभरात १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण नोंदणीची सुरवात बुधवारी दुपारी चार वाजता झाल्यावर पहिल्या तीन तासातच १ कोटी लोकांनी रजिस्ट्रेशन केल्याचे समजते. अगोदर जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार १ मे पाहून या वायोगटासाठी लसीकरण सुरु होणार आहे. लसीची कमतरता आणि करोनाचा वाढता प्रभाव यामुळे अनेकांनी लवकरात लवकर लस मिळावी यासाठी तातडीने नोंदणी केली असली तरी त्यांना अजून लसीकरणाची वेळ, तारीख मिळू शकलेली नाही. दरम्यान नोंदणीची गर्दी झाल्याने कोवीन साईट क्रॅश झाल्याचे सांगितले जात होते. मात्र तसा कोणताही प्रकार घडला नसल्याचा खुलासा संबंधितानी केला आहे.

लसीची कमतरता जाणवत असल्याने या क्षेत्रातील तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार याच काळात ४५ पेक्षा अधिक वयोगटाच्या दुसऱ्या डोसची वेळ येत आहे. त्यामुळे ही नवी मोहीम कशी राबविली जाणार असा प्रश्न आहे. महाराष्ट्र, गोवा, छतीसगढ़ राज्यांनी १ मे पासून १८ वरील वयोगटाचे लसीकरण होणार नसल्याचे जाहीर केले आहे. राजस्थान, प.बंगाल सरकारनेही असेच सांगितले आहे.

दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार नोंदणी सुरु होताच कोवीन पोर्टल वर प्रती सेकंड ५५ हजार हिट्स आले आहेत.