परवडणाऱ्या किमतीत लवकरच येतेय महिंद्राची ई एक्सयुव्ही ३००

भारतात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना आखल्या जात असल्या तरी इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहेत. यामुळे सर्वसामान्य माणसाला परवडेल आणि फॅमिली कार म्हणून वापरता येईल अशी एक कार महिंद्रा अँड महिंद्रा लवकरच बाजारात आणत आहे.

ही कार म्हणजे कंपनीच्या लोकप्रिय एक्सयुव्ही ३०० चा इलेक्ट्रिक अवतार आहे. अर्थात त्यात काही बदल केले गेले आहेत. भारतात पहिली इलेक्ट्रिक कार २०१९ मध्ये लाँच झाली त्यानंतर ह्युंदाईने कोना ही इलेक्ट्रिक कार याच वर्षात लाँच केली होती. हायरेंज कार मध्ये उत्तम फिचर्स आणि तरीही किंमतीत कमी अशी ई एक्सयुव्ही ३०० महिंद्र बाजारात आणत आहेत.

ही कार कमी वेळात चार्ज होणार आहेच पण एका सिंगल चार्ज मध्ये ती ३७५ किमी अंतर धावू शकणार आहे. ही पाच सिटर कार आहे म्हणजे खरी फॅमिली कार. ही कार १३ लाखापासून ते १८ लाख या रेंज मध्ये उपलब्ध केली जाईल असे सांगितले जात आहे. पुढच्या तिमाहीत ही ई एक्सयुव्ही ३०० बाजारात दाखल होईल असेही समजते.