दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण


दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण झाली असून याबाबतची माहिती अल्लू अर्जुनने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. कोरोना चाचणी अहवाल मिळाल्यानंतर आपण स्वत: ला घरीच क्वॉरंटाईन केल्याचे त्याने म्हटले आहे.

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये अल्लू अर्जुनने लिहिले आहे की, मी कोरोनाबाधित झालो, असून मी स्वत: ला घरी आयसोलेट केले आहे आणि सर्व प्रोटोकॉलचे पालन करत आहे. गेल्या काही दिवसात जे कुणी माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनीही कोरोना चाचणी करून घ्यावी.


आपल्या चाहत्यांना स्वतःची काळजी घ्यावी आणि घरीच राहावे आणि लस घ्यावी, असे आवाहन अल्लु अर्जुनने केले आहे. अल्लू अर्जुनने आपल्या आरोग्याबद्दल लिहिले की, मला माझ्या चाहत्यांना आणि हितचिंतकांना सांगायचे आहे की त्यांनी घाबरू नये, मी पूर्णपणे स्वस्थ आहे.

गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुन त्याच्या ‘सीटी मार…’ गाण्यामुळे चर्चेत आहे. त्याचे हेच गाणे सलमान खानच्या राधे चित्रपटात वापरण्यात आले आहे. या हिट गाण्याबद्दल सलमाननेही अल्लू अर्जुनचे कौतुक केले आहे.