कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आज चौकशीसाठी उपस्थित राहू शकणार नाही रश्मी शुक्ला


मुंबई : आपण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईत होणाऱ्या चौकशीसाठी हजर राहू शकणार नसल्याचे एका पत्राच्या माध्यमातून राज्य गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांनी मुंबई पोलिसांना कळवले आहे. त्यांची फोन टॅपिंग प्रकरणात आज चौकशी होणार होती.

राज्य गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांना मुंबई सायबर पोलिसांनी राज्याचे राजकारण ढवळून काढणाऱ्या फोन टॅपिंग प्रकरणात समन्स बजावला होते. फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांचा बुधवारी जबाब नोंदवला जाणार होता. रश्मी शुक्ला यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी हे समन्स पाठवल्याची माहिती मिळत आहे.

माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांनी ऑफिशल सिक्रेट्स अॅक्टचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे फोन अवैधरित्या टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.