अदर पुनावाला यांनी १०० रुपयांनी कमी केली कोव्हिशिल्डची किंमत


पुणे – आपल्या कोव्हिशिल्ड या लसीची किंमत सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने आता १०० रुपयांनी कमी केली आहे. ही लस पूर्वी राज्य सरकारांना ४०० रुपयांना मिळत होती. ती आता ३०० रुपयांना मिळणार आहे. यासंदर्भातील माहिती स्वतः सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच लसीचे नवे दर सीरम इन्स्टिट्युटने जाहीर केले होते. यानुसार राज्य सरकारांसाठी ४०० रुपये प्रति डोस अशी किंमत असून खासगी रुग्णालयांसाठी हीच लस ६०० रुपयांना असणार अशी माहिती देण्यात आली होती.


सीरमने आता नवे दर जाहीर केले असून या नव्या दरानुसार, राज्य सरकारांना ही लस ३०० रुपयांना उपलब्ध होणार आहे. पण खासगी रुग्णालयांना या लसीसाठी पूर्वीचीच किंमत म्हणजे ६०० रुपयेच मोजावे लागणार आहेत. दरम्यान, देशभरात १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र, देशात अनेक ठिकाणी लसींची कमतरता भासत आहे.