पेपा – जगात सर्वात मोठी अंडी देणारी खास कोंबडी

सोशल मीडियावर कधी, काय ट्रेंड होऊ लागेल याचा अंदाज बांधणे अवघड. सध्या इंग्लंडच्या साउथ योर्कशायर मधील एक कोंबडी सोशल मीडियावर तुफान ट्रेंड होते आहे. या कोंबडीचे नाव पेपा असून पेपर्स फिल्ड पोल्ट्रीचा मालक तिला क्वीन म्हणतो. पेपा तीन वर्षाची आहे. या पोल्ट्री फार्मवर अक्षरशः हजारो कोंबड्या आहेत पण पेपाची सर् कुणालाच नाही.

पेपा सोशल मिडियावर प्रसिद्ध झाली ती ७१ वर्षीय जेनिस शार्प हिने खरेदी केलेल्या अंड्याच्या ट्रे मुळे. जेनिसने अंड्याच्या जो ट्रे खरेदी केला त्यातील एक अंडे बाकी सर्व अंड्यांच्या तुलनेत तिप्पट मोठे होते. या अंड्यात ३ पिवळे बलक होते. त्यामुळे जेनिसने त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि पेपा प्रसिद्धीच्या झोतात आली.

अंडी कोंबडीची असतात, तशी बदकाची सुद्धा असतात. जगात सर्वात मोठे अंडे शहामृग पक्षाचे असते. पांढरी, ब्राऊन, काळ्या रंगाची अंडी सुद्धा असतात. पेपाचा मालक सांगतो पेपा अन्य कोंबड्यांच्या अंड्याच्या तुलनेत मोठी अंडी देते आणि ती विशेष भावाने विकली जातात. कारण यात एका अंड्यात तीन बलक असतात. तज्ञ म्हणतात, एका अंड्यात तीन बलक अशी केस अडीच कोटी मध्ये एखादी असते.