जुळ्या बहिणींची अजब समस्या

अमेरिकेतील ब्रिटनी आणि ब्रायाना या जुळ्या बहिणी जन्मापासून खऱ्या अर्थाने एकत्र आहेत. म्हणजे शाळा, कॉलेज पदवी त्यांनी बरोबरच केली यात विशेष नाही. वाहन चालक परवाना दोघींनी बरोबरच घेतला.त्यात त्या दोघी आयडेन्टीकल ट्विनस आहेत. म्हणजे एकीला झाका आणि दुसरीला काढा. ओळखता येणार नाहीत इतक्या सारख्या दिसणाऱ्या. त्यात एकसारखे कपडे घातले की बघायलाच नको. त्यांचे इन्स्टाग्राम पेज आहे आणि त्या दोघी सध्या थोड्याच अंतराने त्यांच्या मुलांना जन्म दिल्यामुळे चर्चेत आहेत.

विशेष म्हणजे या दोघींचे नवरेही जुळे आहेत. तेही आयडेंटिकल ट्विन आहेत. २०१७ मध्ये त्यांची एकमेकांशी ओळख झाली आणि सहा महिने डेटिंग केल्यावर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हे चौघे आणि आता त्यांची मुले सर्व एकत्र राहतात. या लग्नामुळे या दोघींना वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागले होते. प्रथम आपला नवरा नक्की कुठला हे त्यांना ओळखूच येत नसे. पण हळूहळू काही विशिष्ट खुणा, लकबी, हालचाली यावरून त्यांना आपापले नवरे नीट ओळखू येऊ लागले असे त्या सांगतात.