रियलमी ८ फाईव्ह जी मध्ये व्हर्च्युअल रॅम सुविधा

रियलमी ८ फाईव्ह जी चा पहिला सेल २८ एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता सुरु होत असून फ्लिपकार्टवर हा फोन ग्राहकांना मिळू शकणार आहे. आकर्षक डील ऑफर सह हा फोन उपलब्ध करून दिला गेला आहे.

विशेष म्हणजे या फोनला व्हर्च्युअल रॅम सुविधा दिली गेली आहे. ४ आणि ८ जीबी रॅम अश्या दोन व्हर्जन मध्ये हे फोन आहेत. युजर ४ जीबी रॅम ५ जीबी पर्यंत तर ८ जीबी रॅम ११ जीबी पर्यंत गरजेनुसार बदलू शकणार आहेत. या फोनला ६.५ इंची फुल एचडी डिस्प्ले, डायमेनसिटी ७०० फाईव्ह जी प्रोसेसर, अँड्राईड ११ ओएस दिली गेली आहे.

बॅक पॅनल ला ट्रिपल कॅमेरा सेट असून प्रायमरी कॅमेरा ४८ एमपीचा आहे. २ एमपीचे दोन अन्य सेन्सर आहेत. फ्रंट ला १६ एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनला ५ हजार एमएएचची १८ डब्ल्यू फास्ट चार्जरसह बॅटरी दिली गेली आहे. दोन्ही मॉडेलसाठी १२८ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. ४ जीबी व्हेरीयंटची किंमत १४९९९ तर ८ जीबी व्हेरीयंटची किंमत १६९९९ रुपये आहे. एचडीएफसी क्रेडीट कार्ड वर फोन खरेदी केल्यास १० टक्के सवलत मिळणार आहे. अॅक्सिस बँक कार्ड वर खरेदी केल्यास ५ टक्के कॅश बॅक मिळणार आहे.