चीनी लस सर्वाधिक असुरक्षित असल्याचे चीनी तज्ञांचे म्हणणे

चीन मध्ये तयार झालेल्या आणि ५० हून अधिक देशांना निर्यात करण्यात आलेल्या सिनोवॅक या चीनी लसीबद्द्द्ल एक महत्वाची माहिती बाहेर आली आहे. या संदर्भात लिक झालेल्या काही कागदपत्रांनुसार चीनी लस तज्ञांनी सिनोवॅक्स जगात उपलब्ध असलेल्या कोविड १९ लसी मध्ये सर्वात असुरक्षित असल्याने मत नोंदविले आहे. जगभर भयावह परिस्थिती निर्माण केलेल्या कोविड १९ चा उगम चीन मधूनच झाल्याचा दावा केला जात असला तरी त्याचा ठोस पुरावा मिळालेला नाही. मात्र आता चीनी लसी विषयी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

लिक झालेल्या कागदपत्रानुसार चीनी वैज्ञानिकांच्या मते चीन निर्मित आणि प्रशासित कोविड १९ लसीनंतर येणाऱ्या दुष्परिणामांसंदर्भात महत्वाची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने सिनोवॅकच्या आपत्कालीन उपयोग संदर्भात २६ एप्रिल रोजी समीक्षा केली आहे. त्यापूर्वीच या लसीचा रहस्यभेद झाला आहे.

ही लस घेतल्यावर अनेकांना ताप, उलट्या, जुलाब, हृदय आखडल्यासारखे वाटणे, श्वास घेण्यास त्रास होणे असे दुष्परिणाम जाणवले आहेत. त्या संबंधीचा अहवाल ८ एप्रिल रोजी जाहीर केला गेला आहे. अन्य काही कागदपत्रात एका व्यक्तीला ही लस घेतल्यावर ४७ दिवसांनी त्याचा करोना रिपोर्ट पोझिटिव्ह आल्याचा उल्लेख आहे. या पूर्वी जेथे जेथे ही लस दिली गेली तेथेही तिचा नकारात्मक प्रभाव दिसून आला आहे. गतवर्षी शांघाई मधील लस तज्ञ ताओ लिमा यांनीही ही लस असुरक्षित असल्याचे मत व्यक्त केले होते पण नंतर अचानक त्यांनी ते बदलले.

फिलीपिन्स, इजिप्त, मलेशिया अश्या सुमारे ५० देशात ही लस दिली गेली आहे आणि तेथेही अनेक नागरिकांना या लसीचे दुष्परिणाम भोगावे लागले असल्याचे समजते.