इरफान खानची आठवण आणि ऑस्कर

बॉलीवूड मध्ये अमाप लोकप्रियता मिळविलेल्या गुणी अभिनेत्याला म्हणजे इरफान खान याला आपल्यातून जाऊन २९ एप्रिल रोजी वर्ष होत आहे. त्या निमित्ताने त्याचे मित्र, कुटुंब आणि स्नेही अनेक आठवणीना उजाळा देत आहेत. इरफानने बॉलीवूड प्रमाणेच हॉलीवूड मध्येही बरयाच चित्रपटात काम केले आहे. हॉलीवूड चित्रपट म्हटले की प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्काराची चर्चा होणे अपरिहार्य आहे. नुकतीच ऑस्कर जाहीर झाली आहेत. त्या निमीत्ताने इरफानची एक आठवण.

एका मुलाखतीत इरफानला विचारले गेले होते की तुला ऑस्कर मिळाले तर तू ते कुठे ठेवशील. इरफान स्वभावाने अतिशय आनंदी आणि विनोदी होता. एका क्षणात त्याने उत्तर दिले की, ऑस्कर मिळाले तर ते स्वतः घरात कुठेतरी स्वतःला जागा करून घेईलच. पण मी ते बाथरूम मध्ये नक्की ठेवणार नाही हे आत्ताच सांगतो.

इरफानचा शेवटचा चित्रपट होता इंग्रेजी मिडीयम. पण आजही त्याची जागा चाहत्यांच्या हृदयात कायम राहिली आहे.