जगातले पहिले पीएस एलटीई नेटवर्क सॅमसंगने द. कोरियात उभारले

सॅमसंगने सोमवारी द. कोरियात मोबाईल ऑपरेटरच्या सहकार्याने जगातले पहिले ३ जीपीपी सक्षम राष्ट्रीय सार्वजनिक सुरक्षा (पीएस एलटीई) नेटवर्क सुरु केल्याची घोषणा केली आहे. ७०० मेगाहार्ट्स स्पेक्ट्रम मध्ये संचालित होणारे हे नेटवर्क त्वरित प्रतिसादाची अपेक्षा असलेल्या पोलीस, अग्निशमन दल, आपत्कालीन चिकित्सा, लष्करासह ३३० हून अधिक सार्वजनिक सुरक्षा संस्था, एजन्सीना वेगवान तरीही सुरक्षित आणि विश्वासार्ह कनेक्टीव्हिटी देणार आहे.

सॅमसंगचे बिझिनेस नेटवर्क उपाध्यक्ष सेईगिल किम म्हणाले जगातले असे पहिले नेटवर्क सुरु केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. विश्वसनीय आणि उच्च प्रदर्शन याबाबतची सर्व मानके पूर्ण करून पीएल एलटीई नेटवर्क सेवा कोरिया साठी देणे आम्ही सुरु ठेवणार आहोत. गतवर्षी सॅमसंगने क्लाउडवर जगातील पहिल्या मिशन क्रिटीकल पुश टू एक्स व्हिडीओ कॉलचे प्रदर्शन केले होते.