युक्रेनच्या मॉडेल्ससह दुबईत न्यूड फोटोशूट करणाऱ्या अमेरिकन प्लेबॉयला अटक


दुबई: युक्रेनच्या मॉडेल्ससह न्यूड फोटोशूट करण्याच्या आरोपात अमेरिकन प्लेबॉयला दुबई पोलिसांनी अटक केली आहे. विटाली ग्रेचिन असे अटक करण्यात आलेल्या अमेरिकेन प्लेबॉयचे नाव असून तो दुबईतील अपार्टमेंट आणि खासगी यॉटवर मॉडेल्ससह रंग उधळत होता. युक्रेनच्या मुलींची दुबई पोलिसांनी त्यांच्या मायदेशी रवानगी केली असून त्यांच्यावर पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. तर, न्यायालयासमोर ४१ वर्षीय विटाली ग्रेचिनला हजर करण्यात येणार आहे.

विटाली ग्रेचिनची अटकेच्या कारवाईनंतर वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आहे. त्यानंतर दुबईतील डिटेंसन फॅसिलिटीमध्ये विटालीला ठेवण्यात आले आहे. विटालीने एका मुलाखतीत मुलींची नग्न छायाचित्रे काढण्यासाठी माफी मागितली. त्याने दुबईतील ज्या उंच इमारतीत मुलींची नग्न छायाचित्रे काढली, ती अनेक देशांमध्ये सामान्य बाब असल्याचा दावा त्याने केला.

त्याचबरोबर ग्रेचिनने फोटो काढण्यात आलेल्या मॉडेल्स मैत्रिणी असल्याचा दावा केला आहे. मैत्रिणी आणि ग्रेनिच हे सुट्टीवर आले होते. आरोपीने प्लेबॉयने म्हटले की, महिलांचे न्यूड फोटोशूट केल्यानंतर त्याला लाखोंचे बिल द्यायचे आहे. आपली मोठी रक्कम जामिनावर खर्च झाली असल्याचे त्याने म्हटले. या न्यूड फोटोंचा वापर जाहिरात अथवा पोर्नोग्राफिक म्हणून करणार नव्हतो, असेही त्याने स्पष्ट केले.

एका मुस्लिम देशात आरोपी विटाली ग्रेचिनने केलेल्या या चुकीबद्दल माफी मागितली आहे. लोकांकडून चुका होतात आणि माफी मागितली जाते, मी देखील माफी मागत असल्याचे त्याने म्हटले. या न्यूड फोटोशूटवरून काही दिवसांपूर्वीच गदारोळ झाला होता. एका इमारतीच्या बाल्कनीत नग्न महिला आल्या होत्या. त्यावेळी त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर दुबई पोलिसांनी तातडीने पावले उचलली.

दरम्यान बराक ओबामा, हिलरी क्लिंटन, जॉर्ज क्लूनी, सिल्वेस्टर स्टॅलोन आणि युक्रेनच्या राष्ट्रपतींचे दिवंगत पुत्र व्हिक्टर यानुकोविचोवसह अनेक प्रसिद्ध व्यक्तींसोबत विटालीची छायाचित्रे आहेत.