लायसेन्स शिवाय भारतात चालविता येणाऱ्या चीनी इलेक्ट्रिक स्कुटर 

भारतात इलेक्ट्रिक वाहनांना दिले जात असलेले प्रोत्साहन आणि त्यामुळे निर्माण झालेल्या स्पर्धेत चीनी ब्रांड डीएओ (दावो) त्यांच्या खास ई स्कुटर सह बाजारात दाखल झाला आहे. या स्कुटर चालविण्यासाठी परवाना किंवा लायसन्सची आवश्यकता नाही. या सर्व स्कुटर लो स्पीड म्हणजे कमी वेगाने धावणाऱ्या असून त्यांचा ताशी सर्वाधिक वेग २५ किमी पर्यंत आहे. मात्र एकदा फुल चार्ज केल्यावर त्या ८० किमी अंतर पार करू शकतात असा कंपनीचा दावा आहे.

कंपनीने सादर केलेल्या स्कुटर मध्ये विद्युत १०६, १०८, जोर ४०५  भारतीय बाजारात दाखल झाल्या असून यापूवी भारतीय बाजारात दावो ७०३ ई स्कुटर पेश केली होती. कमी वेगाच्या इलेक्ट्रिक स्कुटर चालविण्याचा खर्च कमी येतो आणि रायडरला लायसन्सची गरज नसते. दावो च्या कमी वेगाच्या तीन इलेक्ट्रिक स्कुटर जवळ जवळ सारख्याच प्रकारच्या आहेत पण विद्युत १०६ आणि १०८ सिंगल चार्ज मध्ये ८० किमी धावू शकतात असा दावा आहे, अन्य स्कुटर एका सिंगल चार्ज मध्ये ७० किमी पर्यंत जाऊ शकतात असे सांगितले जात आहे. विद्युत स्कुटर व्यक्तिगत प्रवासाच्या दृष्टीने तयार केल्या गेल्या आहेत तर जोर ४०५ कमर्शियल फ्रेंडली आहे.

वरील तीन स्कुटरना २५० केडब्ल्यूएच बीएलडीसी इलेक्ट्रिक मोटर आणि १.३८ केडब्ल्यूएच बॅटरी दिली गेली आहे. एलईडी हेड लाईट, एलसीडी कन्सोल रिव्हर्स फंक्शन साठी क्रुझ कंट्रोल, की लेस इग्निशन अशी त्यांची फिचर्स आहेत. या स्कूटर्सच्या किमतीबाबत माहिती दिली गेलेली नाही.