अमेरिकेच्या फर्स्ट लेडीने रचला इतिहास

अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल् बायडेन यांनी पेड वर्कर म्हणून काम करणारी अमेरिकेची फर्स्ट लेडी बनण्याचा पराक्रम करून नवा इतिहास रचला आहे. जिल यांची शिक्षिका म्हणून वेगळी ओळख आहे आणि राष्ट्रपतींच्या बरोबरीने फर्स्ट लेडीची सर्व कर्तव्ये पार पाडताना त्यांनी आपली ही ओळख बुजु दिलेली नाही. त्या नॉर्दन व्हर्जिनिया युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम करत असून या काळात त्यांनी ऑनलाईन क्लास घेतले आहेत. झूमच्या मदतीने त्यांनी वॉशिंग्टनच्या कम्युनिटी कॉलेज मध्ये इंग्रजीचे वर्ग घेतले. व्हाईट हाउस मध्ये येऊनही जिल् यांनी नोकरी सुरु ठेवली आहे.

जिल् यांच्याविषयी बोलताना फोर्डहॅम विद्यापीठाच्या प्रोफेसर मोनिका मॅकडरमॉट म्हणाल्या, जिल् वेगळ्याच मुशीतून तयार झाल्या आहेत. त्या हिलरी सारख्या आक्रमक नाहीत, मेलेनिया सारख्या दिखाऊ नाहीत आणि मिशेल सारख्या गंभीर मुद्द्यांवर चर्चा करत नाहीत. निवडणूक अभियानात त्या प्रतिनिधींची कुटुंबे, त्याच्या खासगी अडचणी त्याची माहिती घेतात. त्यानाही करोनाची चिंता आहे.

शाळेत जाणाऱ्या मुलांच्या समस्या समजून घेणे, सैनिक परीवारांशी चर्चा, रुग्णालयात जाऊन तेथील पेशंटचे दुःख समजून घेणे याला त्यांचे नेहमीच प्राधान्य आहे. दक्षिण पश्चिमेकडील राज्यात लसीकरण भीती घालविण्यासाठी त्यांनी तेथील जनतेच्या भेटी घेतल्या होत्या. त्यामुळे जिल बायडेन या खरोखरीच वेगळ्या फर्स्ट लेडी आहेत.