या ठिकाणी अस्थिकलश गाडण्याकरिता ‘दोन गुंठे जमिनी’साठी मोजावे लागतात दिड कोटी रूपये


हाँगकाँग – दिवसेंदिवस हाँगकाँगमधील जमिनीचे भाव वाढतच आहेत. तुम्हाला येथे एखाद्याचा अंत्यविधी झाल्यानंतर त्याची राख गाडण्यासाठी जमिनीचा तुकडा हवा असल्यास त्यासाठी तब्बल 1 लाख 80 पाउंड म्हणजे भारतीय चलनात 1 कोटी 62 लाख रूपये मोजावे लागली. एवढ्या किमतीत एखाद्या पॉश एरियात एखादी जमीन मिळू शकते. 4 लाख अस्थिकलश जमिनींच्या वाढत्या किमतींमुळे जमिनीत गाडल्या जाण्याची वाट पाहात आहेत.

याबाबत माहिती देताना हाँगकाँग फ्यूनरल बिझनेस असोसिएशनचे चेयरमॅन क्वोक होई पोंग यांनी सांगितले की, मृत व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी प्रतिवर्ग फुट जमिनींच्या भावात खूप वाढ झाली आहे. मृत व्यक्तींच्या चितेची राख कुटुंबीय गाडण्याऐवजी ती लॉकरमध्ये ठेवत आहेत.

हाँगकाँगमध्ये कुठेही राख गाडण्यासाठी प्लॉटची किंमत 5 लाख पाउंड (44.5 लाख रूपये) पर्यंत आहे. कब्रिस्तानसाठी शहरी भागात फॅले कॉन्क्रीटच्या जंगलांमुळे खूप कमी जमीन उरली असल्यामुळे नवीन मृतदेह गाडने देखील अवघड झाले आहे. 48 हजार लोकांचा मागील एक वर्षात देशात मृत्यू झाला आहे, पण यापैकी 90 % लोकांना गाडण्याऐवजी जाळले गेले आहे.

Leave a Comment