जिम जमत नाही? ऑफिसातच करा हे व्यायाम प्रकार

exer
आजकाल फिटनेस हा परवलीचा शब्द बनला आहे मात्र व्यस्त जीवनशैलीतून व्यायामासाठी वेळ काढणे अनेकांना शक्य होत नाही. अगदी राहत्या संकुलात जिम असली तरी तेथे जाण्यासाठीही वेळ काढता येत नाही. महिला वर्गाला नोकरी व्यवसाय करतानाच घराची जबाबदारीही सांभाळावी लागते व त्यामुळे त्यांना व्यायामासाठी वेळ काढणे आणखी अवघड बनते. मात्र आजकालच्या युवा पिढीला व्यायामाचे फायदे मान्य आहेत आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी तसेच स्ट्रेस कमी करण्यासाठी व्यायाम उपयुक्त ठरतो याचा अनुभवही ही पिढी घेते आहे. अशा वेळी जिममध्ये न जाताही कार्यालयातच करता येणारे कांही व्यायाम प्रकार देत आहोत.

exer2
आपले ऑफिस वरच्या मजल्यांवर असेल तर लिफ्ट चा वापर न करता जिने चढून जाणे हा व्यायामाच प्रकार आहे. ऑफिसला कारने जात असाल तर कार थोडी दूर पार्क करून चालत कार्यालयापर्यंत जाता येते. खुर्चीवर बसल्याबसल्याच समोर पाय फाकवावे व खांदे सरळ ठेवावे. आता गुडघे असे वाकवावे जसे आपण खुर्चीवर बसलोय. शरीराचे सर्व वजन टाचेवर येऊद्या. पुन्हा मूळ स्थितीत या.

पायाची बोटे ताणून बॉल मारतो त्या पोजमध्ये जा. सरळ उभे राहून गुडघे पायाच्या बोटांच्या दिशेने असे वाकवा की पायाची बोटे तुम्हाला दिसू शकणार नाहीत. पुन्हा मूळ स्थितीत या. पाच सहा वेळा हा प्रकार करा. पाठ भिंतीला लावा व पाय दूर न्या.पाठीचा सारा भार भिंतीवर येऊद्या. गुडघे वाकवून ९० अंशाचा कोन करा. जितका वेळ या स्थितीत राहता येईल तेवढे थांबून मूळ स्थितीत या.

exer1
खांदे कानापर्यंत येतील असे उंच उचलून पुन्हा खाली आणा. खाद्यावरचा ताण कमी करण्यासाठी खांदे वर उचलून गोल गोल फिरवा. बसल्या बसल्या जॉगिंग करण्यासाठी सरळ पाठीच्या खुर्चीवर बसून उजवा पाय उचला त्यावेळी श्वास घ्या. नंतर उजवा पाय खाली आणतानाच डावा पाय उचला व श्वास सोडा. मनगटांसाठीही उजवा हात पसरवून त्यावर डाव्या हाताची बोटे ठेवा व मनगटाच्या दिशेने दुमडा. पायाचे चवडे वर खाली ताणा.

हे सोपे प्रकार कुठेही कधीही करता येतात. महिला पुरूष दोघांसाठीही उपयुक्त आहेत. यात अनेक अवयवांना स्ट्रेचिंग केले जात असल्याने स्नायू ताणले जातात व मोकळे होतात. यामुळे ताजेतवाने वाटते व कामातील उत्साह वाढतो.

Leave a Comment