स्थलांतरित मजूरांचा देवदूत झाला कोरोनामुक्त


कोरोनाचा प्रादुर्भाव देशभरात दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रासह मुंबईतही अतिशय वेगाने वाढत असल्याचे सध्या चित्र आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटपटूंनाही कोरोनाच्या या लाटेत लागण झाली. त्यापैकीच अभिनेता सोनू सूदही एक आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी पोहोचण्यास मदतीचा हात देणाऱ्या सोनू सूदने काही दिवसांपूर्वीच आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. याची माहिती त्याच्या चाहत्यांना मिळताच अनेकांनी सोनूच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली.


पण, आता सोनूच्या चाहत्यांना चिंता करण्याची गरज नाही, कारण कोरोनाच्या संसर्गातून तो मुक्त झाला आहे. याबाबतची माहिती चाहत्यांना खुद्द सोनू सूदनेच ट्विट करत दिली. कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्याचा इशारा करत सोनूने ही आनंदवार्ता सर्वांशीच शेअर केली.