आंब्यामध्ये आहेत विविध औषधी गुण


फळांचा राजा म्हणून आंब्याची ओळख. उन्हाळ्यात मिळणारा हा आंबा सर्वांच्याच आवडीचा आहे. आंब्याचा उपयोग लोणचे, आमरस, बर्फी असे विविध ठिकाणी केला जातो. केवळ चवीलाच आंबा चांगला आहे असे नाही, तर आंब्यामध्ये अनेक औषधी गुण देखील आहे. आंबा विविध व्याधीवर हा उपयोगात येतो. तर आंब्याचे विविध औषधी गुण जाणून घेऊया .

आतड्याचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो. अमाश्याचा रोगांमध्ये आंबा औषध म्हणून कार्य करतो. आंबा खाल्लयाने मलावस्तंभाचा त्रास होत नाही. पिकलेला आंबा पोट साफ करणारा, चरबी वाढविणारा, शक्तिवर्धक आणि उत्साहवर्धक असतो. एखाद्या रुग्णाचे वजन कमी असेल व त्यामुळे त्याची रोगप्रतिकारकशक्ती कमी असेल तर अशा रुग्णास पिकलेला आंबा व त्यासोबत दूध सकाळ, दुपार, संध्याकाळ असे रोज तीनदा द्यावे, आंबा चोखून खाऊन त्यावर दूध प्यावे. उन्हाळ्यात जीभेला गोडवा देणारा आंबा आरोग्य प्रकृतीसाठी देखील विशेष लाभदायी असतो. आंब्याच्या सेवनामुळे मेंदू तल्लख होतोच, पण त्याचबरोबर मानवी त्वचेचे आरोग्यदेखील चांगले राहते, असा दावा वैद्यकीय चिकित्सकांनी केला आहे, पण यासाठी चांगल्या दर्जाचे खाणे आवश्यक आहते, अन्यथा कुठल्याही प्रजातीचे आंबे खाल्ल्यास त्याचे दुष्परिणामदेखील होऊ शकतात,

Leave a Comment