तिहार जेलमध्ये असलेल्या गँगस्टर छोटा राजनला कोरोनाची लागण


नवी दिल्ली – तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला कुख्यात गँगस्टर छोटा राजन याला कोरोनाची लागण झाली आहे. तुरुंगातील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

लक्षणे दिसल्यानंतर छोटा राजनची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात छोटा राजनला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना होम क्वारंटाइन होण्यास सांगितले आहे. यापूर्वी बिहारचा बाहुबली आणि माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन यालाही कोरोनाची लागण झाली होती.

कोरोनाचे रुग्ण तुरुंगातील बॅराक दोनमध्ये आढळून आल्यानंतर छोटा राजनमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामुळे या तुरुंगातील कैद्यांना वेगळे ठेवले गेले असल्याचे तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.