करोना संकटात फ्रांस पंतप्रधान अजब समस्येने हैराण

करोना विरुध्दची लढाई प्राणपणाने खेळावी लागत असतानाच फ्रांसचे पंतप्रधान जिन कॅस्टेक्स अजब समस्येने हैराण झाले आहेत. त्यांना रोज मेल वरून एक पार्सल पाठविले जात असून त्यात एक चिट्ठी आणि महिलांचे अंतर्वस्त्र मिळत आहे. गेले काही दिवस हा प्रकार सुरु आहे आणि पंतप्रधान इच्छा असूनही काही करू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे.

पीएमओ कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार येथे रोज एक नवी मेल येत आहे त्यात वरील वस्तू असतात. सीएनएनच्या बातमी नुसार करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे फ्रांस मध्ये कडक लॉकडाऊन आहे आणि त्यात अनेक दुकाने बंद आहेत. अंतर्वस्त्र विक्री करणाऱ्यांची दुकानेही बंद आहेत. त्यामुळे बाजार उघडा यासाठी हे दुकानदार असे अभिनव अभियान चालवीत आहेत.

फ्रांसमध्ये गरजेच्या वस्तू सोडून सर्व दुकाने बंद आणि नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी लागू आहे. यात फुल विक्रेते, बुक सेलर्स, हेअर कटिंग सलून, रेकॉर्ड विक्रेते याना आवश्यक सेवेत समाविष्ट केले आहे मात्र अंतर्वस्त्र विक्रेत्यांना सामील केले गेलेले नाही. हा अन्याय आहे हे दाखविण्यासाठी अॅक्शन क्युलीटी संघटनेने त्यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान सुरु केले आहे. त्यात २०० रिटेलर्स सामील झाले आहेत. अंतर्वस्त्रे हा स्वच्छता आणि सुरक्षेचा प्रश्न आहे त्यामुळे आम्हाला अत्यावश्यक सेवेत सामील करा किंवा बाजार उघडा अशी त्यांची मागणी आहे. याचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.