या गुरुद्वारात सुरु आहे ऑक्सिजन लंगर

देशात शीख धर्मियांच्या पवित्र गुरुद्वारात कुठेही गेलात तरी तेथे अन्नदान करणारे लंगर असतातच. देशात करोना संकट अधिक गहिरे होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर गाझियाबाद येथील इंदिरापुरम गुरुद्वाराने अनोखा लंगर सुरु केला असून येथे गरजू रुग्णाला ऑक्सिजन पुरविला जात आहे. ऑक्सिजन लंगर असे या उपक्रमाला म्हटले जात आहे.

या साठी ९०९७०४१३१३ असा हेल्प लाईन नंबर जारी केला गेला आहे. गुरुद्वारातील पदाधिकारी सांगतात, कॉल आला की एक गाडी रुग्णाच्या पत्त्यावर पाठविली जाते त्यातून रुग्णाला येथे आणले जाते आणि त्याला हॉस्पिटल मध्ये बेड मिळेपर्यंत ऑक्सिजन पुरविला जातो. घरी जाऊन ही सेवा दिली जात नाही. पण रुग्णाला घरून येथे आणण्याची व्यवस्था केली जाते. त्याचा फायदा अनेक रुग्ण घेत आहेत.