फस्त करता येणारा चविष्ट बूट


आपण आत्तापर्यंत पायात घालता येणारे किंवा फुटबॉल खेळाडूना बक्षीस म्हणून मिळणारे गोल्डन बूट ऐकले आहेत. पण चवीने खाता येणारा बूट ऐकला नसेल. हुबेहूब ब्रान्डेड बुटासारखा दिसणारा हा खायचा बूट चीनी शेफ युजीया हु याने बनविला असून त्याला पारंपारिक जपानी डिश सुशीचे नाव दिले गेले आहे. हा बूट शु शी नावाने खवैया जमातीत चांगलाच लोकप्रिय ठरला आहे.

असे समजते कि युजीयाला लहानपणापासून बास्केट बॉल ची खूप आवड आहे मात्र सुरवातीपासूनच त्याला घरच्या व्यवसायात शेफ म्हणून काम करावे लागले. आपली खेळाची हौस भागविण्यासाठी त्याने नव्या आकर्षक आकारात पदार्थ बनविले. तो सध्या इटलीतील एका रेस्टोरंट मध्ये शेफ व food artist म्हणून काम करतो. त्याने आत्तापर्यंत बास्केटबॉल खेळाडू, जर्सी, टीशर्ट, हेडफोन या आकाराचे पदार्थ बनविले आहेत. त्यात आता बुटाची भर पडली आहे.

हा बूट चिकट भात, मासे, समुद्री काळे शेवाळ व अन्य पदार्थ वापरून ३० मिनिटाल बनविला जातो. प्रत्यक्ष डिश मध्ये येताना तो खराखुरा बूट वाटतो.

Leave a Comment