पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रात पोहोचली

देशातील पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टणम येथून महाराष्ट्रातील नागपूर आणि नंतर नाशिक रोड येथे पोहोचली आहे. या एक्सप्रेस गाडीतून ७ लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे टँकर महाराष्ट्रासाठी आले आहे. शुक्रवारी रात्री ही स्पेशल ट्रेन नागपूर येथे पोहोचली आणि सकाळी नाशिक रोड येथे आली.

रेल्वे विभागाने देशात सुरु असलेली करोना लढाई जिंकण्यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेस चालविल्या आहेत. महाराष्ट्रासाठी या पहिल्या ट्रेन मधून आलेल्या सात ऑक्सिजन टँकर पैकी चार नागपूर येथे उतरविण्यात आले आहेत. देशाच्या ज्या राज्यात ऑक्सिजनची कमतरता आहे किंवा दुसरी कडून ऑक्सिजन आणण्यात अडचणी आहेत तेथे रेल्वेने ऑक्सिजन एक्सप्रेस मागणी नुसार सुरु केल्या आहेत.

गतवर्षी सुद्धा करोना काळात रेल्वेने खाद्य पदार्थ आणि मेडिकल उपकरणे देशभरात आवश्यकतेनुसार पुरविण्यासाठी स्पेशल ट्रेन चालविल्या होत्या. उत्तर प्रदेशाला बोकारो येथून ऑक्सिजन पुरविला जात असून अशी दुसरी ट्रेन लखनौ मध्ये दाखल झाल्याचे समजते. मध्य प्रदेश सरकार सुद्धा ऑक्सिजन ट्रेन साठी प्रयत्न करत आहे.