देशातील किती टक्के लोक नियमित परफ्युम वापरतात?


मुंबई : आपल्या शरीराला सुगंध येण्यासाठी प्रत्येक जण काही न काही प्रयत्न करत असतो. पण देशातील केवळ ३० टक्के लोक दररोज परफ्युमचा वापर करतात, तर अनेक जण परफ्युमच्या महागड्या किंमतीमुळे वापर टाळत असल्याचे एका सर्वेक्षणामध्ये समोर आले आहे.

दररोज परफ्युमचा वापर करत असल्याचे ३० टक्के लोकांनी सांगितले, तर उर्वरित ७० टक्के लोकांनी कधी तरी परफ्युमचा वापर करतो सांगितले. मात्र परफ्युमच्या किंमत कमी असतील तर दररोज वापर करु, असेही या सर्वेक्षणामध्ये म्हटले आहे.

‘भारतातील परफ्युमचा वापर’ असा एक रिपोर्ट सिंथॉल डियोस्टीकने एसी निल्सनसह जारी केला आहे. यामध्ये उत्तर भारत, पश्चिम भारत आणि दक्षिण भारतातील तरुणांशी आणि महिलांशी बॉडी स्मेल आणि परफ्युमच्या वापरावर चर्चा करण्यात आली.

Leave a Comment